क्राईम डायरी प्रतिनिधि - सर्जेराव पोवार
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.दिनकर मोहीते व त्यांच्या पथकाने हातकणंगले पो. ठाणे गु.र.नं. 14/2017 भा.द.वि.स.क. 457, 380 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध त्यांना तात्काळ अटक करून चोरीस गेला मुद्देमाल हस्तगत करून सदर गुन्हा उघडकीस आणला. या त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरी व अथक परीश्रमाबद्दल मा.महादेव तांबडे, पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी प्रशस्तिपत्र देवून सत्कार केला.
तसेच यावेळी
गगनबावडा पो. ठाणे गु.र.नं. 41/2015 भा.द.वि.स.क. 302 प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास योग्य प्रकारे केल्याने गुन्ह्यातील आरोपी महिलेला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा झाली. सदर गुन्ह्याचा तपास योग्य प्रकारे केल्याबद्दल गगनबावडा पोलीस ठाणेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री.एस.ए.जमादार, सपोनि आय.ए.सय्यद, पोना/464 पवार, पोशि/2054 यादव यांचाही मा.महादेव तांबडे, पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांचे हस्ते प्रशस्तिपत्र देवून सत्कार केला.
0 comments:
Post a Comment