कागल तालुक्यातील पिराचीवाडी इथे बोगस डॉक्टर साताप्पा रोडे याच्या गर्भनिदान केंद्रावर जिल्हा शल्यचिकित्सक आणि कागल पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा धाड टाकली. मात्र अंधाराचा फायदा घेऊन या केंद्राचा मुख्य सूत्रधार सोनोग्राफी मशीन घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. गुरुवारी सकाळपर्यंत घटनास्थलावर पंचनामा सुरू होता.
कागल तालुक्यातील पिराचीवाडी इथे अनधिकृत गर्भलिंग केंद्र सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील याना मिळाल्यावर त्यांनी कागल पोलिसांची मदत घेऊन त्यांनी बोगस डॉक्टरला रंगेहाथ पकडण्यासाठी पोलिसांच्या व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा लावला होता .सीपीआरमधील एक महिला कर्मचारी व कागल पोलिस ठाण्यातील पोलिसाची पत्नी असे दोन डमी ग्राहक तेथे पाठविण्यात आले होते , त्यांच्या सोबत कागल पोलीस ठाण्याचे एक पथक गेले. हे केंद्र एका घरात डोंगरावर असल्याने तिथे रात्री अंधारात जाण्यास अडचणी येत होत्या. या पथकाआधीच त्या ठिकणी अन्य तीन जोडपी अनधिकृत रित्या गर्भलिंग चाचणी करून घेण्यसाठी दाखल झाले होते. या केंद्रात अनधिकृतरीत्या गर्भलिंग चाचणी सुरु असल्याची खात्री झल्यावर पोलिसांनी केंद्रचालक बोगस डॉक्टर सत्ताप्पा रोडे याला ताब्यात घेतले. मात्र अंधारचा फायदा घेऊन रोडेने त्या ठिकाणाहून पलायन केले. तसेच त्याच्या इतर साथीदारांनी सोनोग्राफी मशीन घेऊन पळ काढला.त्यामुळे तपास पथकाच्या हाती काहीच लागले नाही.
पोलिसांचा छापा पडल्याचे समजताच साताप्पा उर्फ पिंटू रोडे गर्भलिंग निदानासाठी वापरण्यात येणारे मशिन घेऊन पसार झाला असला तरी पोलिसांनी होंडा सिटी ,विविध चारचाकी, दुचाकी वाहने ताब्यात घेतली आहेत यात ग्राहकांच्या वाहनांचीही समावेश आहे , पोलिसांची चाहूल लागताच डॉक्टर , त्याचे साथीदार व तपासणीसाठी आलेल्या पेशन्ट व नातेवाकांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला त्यामुळे पोलिसांच्या ताब्यात ठोस असे काही न लागल्याचे समजते
सध्या PC & PNDT Act या कायद्याने गर्भलिंग निदानावर बंदी घातली असली तरी असे चोरी छुपे प्रकार सर्वत्र चालू आहेत हेच या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे

0 comments:
Post a Comment