Tuesday, 14 February 2017

कोल्हापुरात वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक फौजदारावर चाकूहल्ल्याचा प्रयत्न - तीन अटकेत



दुचाकीवरून तिब्बल सीट जाणार्‍या तरुणांनी उमा टॉकीज चौकात वाहतूक पोलिसांना दमदाटी करून चाकूहल्ल्याचा प्रय▪केला. पोलिसांनी त्या तरुणांना अटक केली आहे. सोमवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सहायक फौजदार गंगाधर भीमा पवार (वय ५७, रा. कसबा बावडा) यांनी याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

जावेद सिकंदर जमादार (वय २६), सुमित सुरेश पवार (वय २६, रा. दोघे रविवार पेठ) व धैर्यशील अशोक माने (रा. केर्ली, ता. करवीर) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. लक्ष्मीपुरी पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडून राजवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांचे अन्य दोघे सहकारी पळून गेले आहेत. राजवाडा पोलिसांनी पोलीस ठाण्यातच त्यांना खाक्या दाखवला.

याबाबत समजलेली माहिती अशी, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक फौजदार गंगाधर पवार व पोलीस कॉन्स्टेबल माने असे दोघे जण सोमवारी उमा टॉकीज चौकात वाहतूक नियंत्रण करत होते. सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास गोखले कॉलेजकडून दुचाकीवरून तिघे तरुण आले. तिब्बल सीट जाणार्‍या या तरुणांना सहायक फौजदार पवार यांनी अडवले.
    त्यावेळी तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते. लायसेन्स मागणार्‍या पोलिसांना त्यांनी दमदाटी करण्यास सुरुवात केली.
पवार व माने या पोलिसांना दमदाटी करत असताना लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत व त्यांचे पथक तेथून जात होते. पोलिसांनी दमदाटी करणार्‍या त्या तिघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर काही मिनिटात या तिघांचे अन्य दोन साथीदार चौकात आले व त्यांनी पवार व माने यांना शिवीगाळ करण्यास सुरू होती. त्यातील एका तरुणाजवळ चाकू होता. हा तरुण पोलिसांवर चाकूने हल्ला करण्याच्या तयारीत होता.
  पोलिसांवर हल्ला करण्याऱ्या  या तिघा तरुणांना पोलिसांनी खाक्या दाखवत त्यांची मग्रुरी उतरवली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तिघाही तरुणांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र भूतकर करत आहेत.


0 comments:

Post a Comment