Thursday, 16 February 2017

कोल्हापूरात गुंडाराज - नगरसेवकाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न

प्रतिनिधि - सर्जेराव पोवार , कोल्हापूर

भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच कोल्हापूरात काल रात्री पावणे एक वाजता काही गुंडांकडून नगरसेवक राजसिंह शेळके यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला , यात त्यांना दगडाने
ठेचून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे , भाजप- ताराराणी आघाडीचे  नगरसेवक असलेल्या शेळके हे आपले घरी असताना भागातील नागरिक भेटण्यासाठी आले होते  म्हणून गेटजवळ गेले असता गेट समोर त्यांना संशयित आरोपी व त्याचे 5 ते 6 साथीदार दिसले असता त्यांनी याला  काय विशेष असे विचारले - यावेळी आरोपीने त्यांना तु भागात लय शहाणा झाला आहेस  तुला बघुन घेतो असे म्हणून तुला खल्लास करतो असे म्हणून   दगड फेकून तोंडावर मारला  शेळकेंनी उजवा हात मध्ये घातला त्यामुळे हाताला दगड लागून  मनगटाजवळ जखम झाली त्याचवेळी साथीदाराना याला सोडू नका खल्लास करा अशी चिथावणी देत सर्वांनी लाथाबुक्याने मारहाण करुन त्याना जखमी केले व पुन्हा गुंडानी दगड उचलून शेळकेंचे डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला तो दुसर्याचे तोंडावर लागून जखमी झाला
प्रभागातील प्रतिष्ठेच्या मुद्द्यावरून हा हल्ला करण्यात आल्याचं समजते. सागर तहसीलदारसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सागर हा गुंड स्वप्नील तहसिलदार याचा भाऊ आहे.
या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये झाली असुन पोलीस पुढील तपास करत आहेत
पण या निमित्ताने कोल्हापुरातीलच नव्हे तर राज्यातील खाकीचा धाक कमी झाला असुन महाराष्ट्रात गुंडाराज सुरु असल्याचे नागरिकांतुन बोलले जात आहे ,लोकप्रतिनिधींची गुंड जर अवस्था करत असतील तर सामान्य नागरिकाची काय दशा !

0 comments:

Post a Comment