Friday, 10 February 2017

बेळगावात शाळकरी मुलांच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात विद्यार्थ्यांचा मृत्यू

 बेळगावातील  बी के मॉडेल स्कुलमध्ये आठवीत शिकणाऱ्या प्रशांत राजू हुलमानी वय १४ या विद्यार्थ्याचा त्याच शाळेतील नववीत शिकणाऱ्या ३ विदयार्थ्यांनी  किरकोळ कारणावरून मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नुकतीच बेळगावात घडली आहे .नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांची बॅग प्रशांतच्या सायकलच्या हॅण्डलला अडकली त्यावरून वाद होऊन तिघाजणांनी प्रशांतला नाजूक भागावर लाथा मारल्याने तो मैदानावर कोसळला , त्यानंतर शिक्षकांनी त्याला जवळच्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले पण प्रशांतचा यात मृत्यू झाला . शिक्षकांनी याची अकस्मात अशी प्रकरण दडपण्यासाठी नोंद केली . पण सदर घटना पाहणाऱ्या इतर विद्यर्थ्यांमुळे या प्रकरणास वेगळीच कलाटणी मिळाली असून याप्रकरणी कॅम्प पोलिसांनी पालकांच्या तक्रारीवरून तीन संशयित विद्यार्थ्यांना अटक करून त्यांना बालगुन्हेगार न्यायालयासमोर उभे करून बालसुधार गृहात रवानगी केली .ज्या शिक्षकांनी या प्रकरणी पोलिसांची दिशाभूल करत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्यांचीही पोलीस चौकशी करत आहे कदाचित त्यांनाही सह आरोपी करण्याची शक्यता आहे व अशा शिक्षकांचे निलंबन व्हावे अशी मागणी मृत प्रशांतच्या पालकांनी व नागरिकांनी केली आहे
   विद्यार्थ्यात वर्चस्व वादातून जर किरकोळ मारामारीच्या घटना घडत असतील तर शिक्षकांनी त्याला झाकून ठेवता वेळीच पालकांशी चर्चा करून यावर घातला पाहिजे नाहीतर भावी पिढी गुंडगिरी करण्यास पुढे मागे पाहणार नाही आणि शाळांमधून आणि कोणत्यातरी विद्यर्थ्याचा बळी जाईल असे मत नागरीकातून व्यक्त होत आहे 

0 comments:

Post a Comment