Wednesday, 8 February 2017

आरग (मिरज) फार्म हाऊसवर छापा , गुटखा कारखाना सील , 2 कोटींचा मुद्देमाल जप्त

पुण्याच्या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने  व स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाईत
आरग (ता. मिरज) येथे एका फार्म हाऊसवर
छापा टाकून राज कोल्हापुरी व यात्री या कंपन्यांचा गुटखा तयार करणारा कारखाना मंगळवारी सकाळी सील केला. गुटखा तयार करण्यासाठीची पाच मशिन, सुमारे 10 लाख रुपये किमतीच्या गुटख्याच्या पुड्या, 20 लाख रुपयांचा कच्चामाल असा सुमारे 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ठिकाणी या कारखान्याचा चालक व कामगार अशा 17 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

0 comments:

Post a Comment