Wednesday, 15 February 2017

कदमवाडी रोडवर लिशां हॉटेल परिसरात काल सकाळी घरफोडी -दीड लाखाचा मुद्देमाल लंपास


क्राईम डायरी प्रतिनिधी - संदीप पोवार

कदमवाडी रोडवर लिशां हॉटेल परिसरात राहणाऱ्या केशव सदाशिव कुलकर्णी यांच्या घरी मंगळवारी सकाळी धाडसी घरफोडी झाली. चोरट्याने बाथरूमची कडी काढून घरात प्रवेश केला व पर्समधील रोख रक्कम व सोन्याचे सहा तोळे दागिने असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.  मंगळवारी सकाळी केशव कुलकर्णी व त्यांची पत्नी अनुराधा असे दोघे फिरण्यासाठी गेले. जाताना त्यांनी समोरच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावले होते. सातच्या सुमारास परत घरी आल्यानंतर अनुराधा यांना पर्समधील पैसे नसल्याचे लक्षात आले. सोन्याचे दागिने ठेवलेली छोटी पर्सही गायब होती. कुलकर्णी दाम्पत्याने घरात शोधाशोध केली; मात्र पर्स सापडली नाही. यानंतर ग्रिलचा दरवाजा उघडल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेजारच्या घराच्या जिन्यातून प्रवेश करून चोरट्याने घरातील पर्स लांबवल्याची फिर्यादी त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या पर्समधील मंगळसूत्र, बांगड्या, सोन्याची पट्टी आणि अंगठी असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल लंपास झाला आहे. कुलकर्णी यांनी याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे

0 comments:

Post a Comment