२४ जानेवारीपासून रेल्वे सुरक्षा धोक्यात आली आहे , सलग तिसऱ्या दिवशी रेल्वेरुळावर घातपाताचा प्रयत्न झाला आहे , दिवा-पनवेल मार्गावर सोमवारी रूळाचा तुकडा आडवा टाकल्यानंतर आणि बुधवारी जसईजवळ विजेचा खांब रूळांवर टाकल्यानंतर गुरुवारी दिवा-पनवेल मार्गावरच रूळांवर जिलेटीनच्या कांडय़ा आढळल्या. या मार्गावर गस्त घालणाऱ्या गँगमनला या कांडय़ा आढळल्यानंतर त्याने याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. यापूर्वी दिवा-मुंब्रा यांदरम्यान रूळांवर टाकलेला एक सात मीटर रूळाचा तुकडा आढळला होता ,बुधवारी पुन्हा पनवेल-जेएनपीटी मार्गावर जसईजवळ ओव्हरहेड वायरचा खांब आडवा टाकला होता.
अकोला-हैदराबाद रेल्वेमार्गावरहि लोहगड ते अमनवाडी रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वे रूळावर एक मोठा दगड ठेवून घातपात घडवण्याचा प्रयत्न झाल्याची मंगळवारी रात्री घडली. लवकरच हा प्रकार लक्षात आल्याने या मार्गावरून धावणाऱ्या काचीगुडा-नरखेड इंटरसिटी गाडीचा अपघात टळला.
हे सर्व वरील प्रकार पाहता रेल्वे रुळावर काहीतरी वस्तू ठेवून सुपरफास्ट गाडयांना घातपात घडवून आणण्याचा अज्ञात विघातक शक्तींचा हात असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे

0 comments:
Post a Comment