15 वर्षांपासून घरकाम करणार्या मोलकरणीजवळ 10 लाख रुपये किंमतीपेक्षा जास्तचे दागिने आणि जवळपास 50 हजार रुपये रोख सापडले आहे.
इंदोर येथील प्रतिष्ठीत व्यापारी अंशुल ओमप्रकाश यांनी पोलिसात तक्रार दिली होती, की त्यांच्या घरातून काही महिन्यांपासून रोख रक्कम आणि दागिने लंपास होत होते.त्यांनी पोलिसात तक्रार दिली त्या दिवशी घरातून 48 हजार 500 रुपये गायब झाले होते.
अंशूल यांनी पत्नी आणि आईला याबद्दल विचारणा केली तर त्यांनीही दोन डायमंडचे कडे, दोन गजरे, 5 सोन साखळ्या, एक चांदीचे नेकलेस, चांदीचा ग्लास आणि जवळपास 3 लाख रुपये गेल्या काही महिन्यात गायब झाल्याचे सांगितले.
अंशुल यांनी दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी गीताबाईला ताब्यात घेतले तेव्हा तिने चोरीशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले.
- त्यानंतर पोलिसी खाक्या दाखविल्यावर तिने बोलायला सुरुवात केली.
- गीताबाईच्या घराची झडती घेतली असता तेथून 48 हजार 500 रुपये रोख आणि 10 लाख रुपयांचे दागिने मिळाले.
- चौकशीत गीताबाईने सांगितेल, की संधी मिळतात ती मालकाच्या रुममध्ये जात होती. रुममध्ये एक नजर टाकून जे सामान हाताला लागेल ते कपड्यांमध्ये लपवून बाहेर निघत होती. त्यानंतर झटपट काम उरकून घराबाहेर पडत होती.
0 comments:
Post a Comment