Thursday, 16 February 2017

लोंघे येथे प्रचाराच्या वाहनाची तपासणी -21हजारांची दारु जप्त

प्रतिनिधि - श्रीकांत चव्हाण

गगनबावडा तालुक्यातील लोंघे येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास पोलीसांनी नाकाबंदी करत निवडणुकीच्या प्रचाराच्या टाटा सुमो मधून वाहतूक होत असलेली दारू जप्त केली आहे , या टाटा सुमो वर एका राजकीय  पक्षाचे स्टिकर्स चिकटवण्यात आल्याने याबाबत संशय अधिकच बळावला आहे की मतदारांना दारु वाटपासाठी ही अवैध दारु वाहतुक केली जात असावी , या प्रकरणी पोलीसांनी टाटा सुमोचा चालक व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेत बुधवारी रात्री 1 च्या सुमारास
सुमारे 21 हजार किमतीची दारू व टाटा सुमो जप्त करण्याची कारवाई केली आहे

0 comments:

Post a Comment