प्रतिनिधि - सर्जेराव पोवार
कोल्हापूरात वाहनचालकांकडुन वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होणे ही काय नवीन गोष्ट नाही , परवातर टिबल सीट चालकाला हटकले असता थेट चाकुहल्लयाचाच प्रयत्न झाला , वाहतुक पोलीसांनी एखाद्याला अडवले तरी लगेच दादा , नाना , नगरसेवक , आमदार , मंत्री , त्यांचे पीए यांना मोबाइल लावुन
"थांब तुझी गडहिंग्लजलाच बदली करतो "
असा दाब दिला जातो , पावती करणे , दंड भरणे लांबच , मग वाहतुक पोलीस पण टार्गेट पुरत्या परगावच्या भाविकांच्याच पावत्या फाडतात व अशा फाळकुट दादांना सलाम करतात , हि कोल्हापूरची वस्तुस्थिती आहे ,
पण ,
या प्रतिमेला छेद देणारी व वाहतुक पोलिसांचे मनोधैर्य उंचावणारी घटना नुकतीच घडली ,
दि १५ /०२ /२०१७ रोजी सीपीआर चौकात सिग्नलला महिला वाहतुक पोलीस कर्तव्य बजावत असता एक युवक मोटरसायकलवरुन सिग्नल तोडुन जात असता महिला पोलीसाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला , पण तो युवक हुलकावणी देत पळुन गेला , नेमके याचवेळी कोल्हापूर शहर डीवायएसपी भारतकुमार राणे हे आपल्या ऑफिसकडे निघाले असता त्याना हा प्रकार निदर्शनास आला , त्यांनी त्वरीत याची दखल घेत त्या मोटरसायकलचा क्रमांक MH09 DU 0909 हा
नियंत्रण कक्षाला कळवला व गाडी मालकाची माहिती घेउन त्याला शहर वाहतुक नियंत्रण शाखेसमोर हजर करण्याचे आदेश दिले , पोलीसांनी गाडी क्रमांकावरुन शोध घेत नामदेव पाटील याला वाहतुक शाखेत हजर केले व त्याच्यकडुन मोटर वाहन कायदा १६१/१७७ , १९/१७७ , ११९/१७७ अन्वये ८०० रुपये दंड ठोठावुन वसुल केला ,
कोल्हापूर शहर डीवायएसपी भारतकुमार राणेंच्या या कर्तव्यदक्ष कृतीमुळे वाहतुक पोलीसांना नक्कीच दिलासा मिळाला असुन अधिकारी आपल्या पाठीशी आहेत असा संदेश पोलीस कर्मचारी वर्गात पसरला आहे ,
तसेच वाहतुक नियम मोडणार्या मुजोर चालकांना हा एक धडाच आहे की नियम मोडल्यावर पोलीस आपल्या घरी येऊन कधीही नोटीस देऊ शकतात !
0 comments:
Post a Comment