क्राईम डायरी प्रतिनिधी - सर्जेराव पोवार
कोल्हापुरातील जेष्ठ विचारवंत नेते प्रा.एन डी पाटील यांची इनोव्हा कार चोरीला गेल्याने कोल्हापुरात खळबळ माजली होती, पोलिसांवर चहुबाजूने टीका झाली होती, पोलीस गस्तीच्यावेळेला झोपा काढतात काय ? अशी विचारणाही नागरिकांतून झाली होती पण कोल्हापूर पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मात्र तत्परतेने आरोपींचा माग काढत कार चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील एका आरोपीस अटक केली आहे आणि त्याच्याकडून इनोवासह एक चोरीची होंडा सिटी कार हस्तगत केली आहे. प्रा.एन डी पाटील यांची इनोव्हा कार .MH09 BX 6929 हि चोरीला गेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस स्टेशनला दाखल झाली होती , कोल्हापूर पोलीस अधीक्षक महादेव तांबडे व अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा प्रमुख पोनि दिनकर मोहिते याना मार्गदर्शन करून तपासाबाबत सूचना केल्या , वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आणि आपल्या अनुभवाच्या आधारे पो नि मोहिते यांनी विविध पथके इनोव्हा कारच्या मागावर पाठवली , अधिक तपासाअंती हि गाडी टोल नाक्याच्या फुटेजच्या आधारे पुण्याच्या आसपास असल्याचे निष्पन्न झाले , पोलिसांनी पाळत ठेवून तळवडे ता हवेली येथील गॅरेज मालक आरोपी जुबेर रझाक सय्यद वय ३७ याच्या मुसक्या आवळल्या व त्याच्याकडून इनोवासह एक चोरीची होंडा सिटी हस्तगत केली , पण मुख्य आरोपी मनजीत सिंग व जोगिंदर सिंग रा दिल्ली हे फरार आहेत , सदर आरोपींची आंतरराज्य टोळी असून मागणीनुसार गाड्या चोरून त्या गाडीला जुन्या स्क्रॅप गाडीची चेस नंबर व नंबर प्लेट लावून परराज्यात गाडी कमी किमतीत विकण्याची यांची मोडस ऑपरेंडी आहे

0 comments:
Post a Comment