Friday, 3 February 2017

दारुसाठी पैशाच्या कारणावरुन खुनप्रकरणी जन्मठेप

दारु पिण्यासाठी पैशांच्या कारणावरुन झालेल्या वादावादीतुन आरोपी संदीप माळी ( वय ३० रा ़ नांदणी , ता शिरोळ ) याने बाबूराव सखाराम पाटील (वय ६०  रा पाल ता भुदरगड ) याचा खुन केल्याचा गुन्हा दि १५ /१० /२०१५ रोजी भुदरगड पोलीस ठाण्यात नोंदवला होता ,आरोपी हा यापूर्वी चोरी, घरफोडीसह अन्य गुन्ह्यात पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे , नुकतीच त्या खटल्याची अंतिम सुनावणी होउन सत्र न्यायाधीश -२ कोल्हापूर व्ही व्ही जोशी यांनी आरोपीवर गुन्हा सिद्ध झाल्याने जन्मठेपेची शिक्षा सुनावली ,खटल्यात एकूण पंधरा साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी युवराज परशुराम तेळवे, बापू बिरू आणुसे, मारुती तुकाराम यादव, तपासाधिकारी बी. टी. बारवकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन गजानन कोरे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. परिस्थितीजन्य पुराव्यासह सरकारी वकिल एस एम पाटील यांचा  युक्तिवाद ग्राह्य मानून न्या. जोशी यांनी संदीप माळीला दोषी ठरविले. याप्रकरणी सरकारतर्फे सरकारी वकील एस एम पाटील यांनी काम पाहिले

0 comments:

Post a Comment