कोल्हापुरात भरदिवसा घडणारी लागोपाठ वाढती घरफोडी, जबरी चोरी, चेन स्नॅचिंगचे प्रमाण अत्यन्त वाढत चालले आहे , नागरिक स्वतःला असुरक्षित समजू लागले आहेत ,काल रविवारी ताराबाई पार्क सर्किट हाऊस समोरील रिट्रिट अपार्टमेंटमधील दुसर्या मजल्यावर डॉ. धीरज भागवत महाजन यांचा फ्लॅट फोडून सोन्याचे दागिने, डायमंड सेट व रोख रक्कम असा ५ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शहराच्या अत्यंत शांत,सुरक्षित व उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या ताराबाई पार्क परिसरात हि घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबतीत समजलेली घटना अशी रिट्रिट अपार्टमेंटमधील दुसर्या मजल्यावर डॉ. धीरज भागवत महाजन व त्यांची पत्नी डॉ. आभा महाजन असे दोघे आपल्या लहान मुलासह भाड्याने राहतात. रविवार क्लिनिकला सुटी असल्याने डॉ. धीरज सकाळी अकराच्या सुमारास पत्नी व मुलग्याला घेऊन चित्रपट पाहण्यासाठी गेले होते.तेथून दुपारी चारच्या सुमारास महाजन घरी आले असता त्यांना फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडलेला दिसला. बेडरूममधील दोन कपाटांतील साहित्य विस्कटलेले होते. त्यातील डायमंड सेट व सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास झाल्याचे दिसले.चोरी झाल्याची खात्री झाल्यावर त्यांनी शेजार्यांना व मित्रांना माहिती दिली.यानंतर पोलिसात चोरीची वर्दी दिल्यानंतर भरदिवसा घरफोडी झाल्याने शहर डीवायएसपी भारतकुमार राणे व शाहूपुरी पोनि प्रवीण चौगुले यांनी त्वरित घटनास्थळी भेट देत पंचनामा केला
ठसे तज्ज्ञ व श्वानपथकाकडून चोरांचा माग काढण्यात आला तसेच परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे , या प्रकरणात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेनेदेखील दखल घेतली आहे

0 comments:
Post a Comment