Monday, 20 February 2017

कोल्हापुरात निर्भया पथक हे केवळ कागदावरच आहे काय ?



CRIME DIARY - SPECIAL REPORT - DNYANRAJ PATIL

                 एकतर्फी प्रेमातुन  वारंवार त्रास दिल्यामुळे गीता हरी बोडेकर (वय १८) या तरुणीने गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केली. बोंद्रेनगरात सहा महिन्यांत हा दुसरा प्रकार झाला ,एकतर्फी प्रेमातुन  वारंवार त्रास दिल्यामुळे गीता हरी बोडेकर (वय १८) या तरुणीने गळफास घेऊन शनिवारी आत्महत्या केली. बोंद्रेनगरात सहा महिन्यांत हा दुसरा प्रकार झाला आहे यापूर्वी याच परिसरात येथे १९ जून, २0१६ रोजी पल्लवी गणपती बोडेकर या तरुणीने तरुणांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्या प्रकरणी करवीर पोलिसांनी देवाप्पा गणपती बोडके, त्याचा भाऊ चौंडू, राजू सोनबा शेळके, त्याचा भाऊ संजय, पांडुरंग बाबूराव शेळके, बबन नागू शेळके (सर्व रा. बोंद्रेनगर ) यांना अटक केली होती.पैकी काहीजण जामिनावर सुटून बाहेर आले आहेत व रुबाबात वावरत आहेत
 वारंवार होणाऱ्या  छेडछाडीला कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्यामुळे कोल्हापुरात तरुणी अजूनही सुरक्षित नाहीत हे स्पष्ट होते.अश्या परिस्थितीत पोलिसांचे निर्भया पथक हे केवळ कागदावरच आहे काय ? असा सवाल नागरिकांतून विचारला जाऊ लागला आहे ,

 यापूर्वीचे पल्लवी प्रकरण असो किन्वा गीता प्रकरण असो परिस्थितीने गरीब असल्याने समाजातील धनदांडग्या व गुंडांकडून नेहमीच अश्या अबलांची पिळवणूक व छळ होतो , या अबला पोलिसात तक्रारही करण्याचे धाडस करत नाहीत आणि केलेच तर पोलिसही न्याय देत नाहीत पण उलट अर्थपूर्ण व्यवहारामुळे आरोपीलाच पाठीशी घालण्याची उदाहरणे यापूर्वी घडली आहेत .
  पोलिसांचे निर्भया पथक फक्त कॉलेजच्या दारात जाऊन काठ्या आपटण्यापुरतेच आहे काय ? ,
तक्रार आल्यावरच आणि आत्महत्या झाल्यावरच कारवाई होणार काय ?
तरुणी व अबलांना संरक्षण देऊन गुंड प्रवृत्तीच्या मजनूंवर धाक जमवणार काय ?
      असे एक ना अनेक प्रश्न नागरिकांतून विचारले जात आहेत , अबला व तरुणीच्या मनात निर्भया पथक विश्वास व आपुलकीचे नाते निर्माण करून त्यांना संरक्षण पुरवेल तेंव्हाच या पथकाचे कार्य सत्कारणी लागले असे म्हणता येईल अन्यथा या पथकाचे निर्माण व्यर्थ ठरेल अन्यथा ज्याप्रमाणे डी बी पथकांची बरखास्ती करावी लागली त्यापद्धतीने निर्भया पथकाची बरखास्ती होईल.


0 comments:

Post a Comment