Friday, 10 February 2017

माहिती उपसंचालक सतीश लळीतसाो यांना क्राईम डायरीतर्फे सदिच्छा भेट

कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाचे माहिती उपसंचालक सतीश लळीतसाो व सहाय्यक संचालक स रा मानेसाो यांना नुकतीच क्राईम डायरीच्या टीमने सदिच्छा भेट दिली , यावेळी लळीतसाो यांनी संपादक बाबासाो जाधव यांच्याबरोबर वार्तालाप करताना गत आठवणींना उजाळा दिला ,
तसेच शहरी व ग्रामीण असा भेदाभेद न करता सर्व पत्रकार बंधुंनी एकजुटीने समाज प्रबोधनाचे व पत्रकारितेचे कार्य करावे , पत्रकार भवन उभारावे असे आवाहन केले
यावेळी त्यांनी साप्ताहिक क्राईम डायरीच्या वेब आवृत्तीचे अवलोकन केले व सुचना केल्या आणि सा क्राईम डायरी च्या भावी वाटचालीला शुभेच्छा व्यक्त केल्या
  याप्रसंगी सा क्राईम डायरी संपादक बाबासाो जाधव व कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधि ज्ञानराज पाटील यांच्या हस्ते लळीतसाो व मानेसाो यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणेत आला , क्राईम डायरीच्या वतीने शहर प्रतिनिधि संदीप पोवार , महादेव लोहार , सतीश पाटील व सर्जेराव पोवार हे उपस्थित होते

0 comments:

Post a Comment