क्राईम डायरी प्रतिनिधि - संदीप पोवार
कोल्हापूरात आज शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये हूंडा व मानपानावरुन छळ व त्यामुळे आत्महत्या झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत
पहिल्या घटनेत मिनाज समीर नदाफ वय 24 रा पिंजार गल्ली , कसबा बावडा हिने गळफास लावुन आत्महत्या केली तर दुसर्या घटनेत शाहूपुरी येथील रिना अमर जाधव वय 28 रा शाहूपुरी ४ थी गल्ली या महिलेने दि २८ जानेवारी २०१७ रोजी गळफास लावुन घेतला असता तिला पुढील उपचारासाठी मेट्रो हॉस्पिटल येथे दाखल केले होते पण तिचाही दि ८ फेब्रुवारीला मृत्यु झाला
दोन्ही प्रकरणात माहेरच्या मंडळीनी विवाहीतांचे पती , सासरा , सासु यांविरुद्ध शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये मानपान , हुंडा यावरुन छळ व आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेची तक्रार केली आहे त्यानुसार शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असुन सासरचे मंडळिना ताब्यात घेतले आहे , पुढील तपास सपोनि जाधव करत आहेत
0 comments:
Post a Comment