एकीकडे नरेंद्र मोदी भारताला डिजिटल बनवायला निघाले असताना इंटरनेटच्या माध्यमातून कोण कशी फसवणूक करेल याचा काही नेम नाही , नुकतेच एका आघाडीच्या वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये एक भोंदू बाबा इंटरनेटवरुन भूतबाधा उतरवत असल्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे , babajibhoot.com या वेबसाईटवरुन गूगल आणि स्काईपवरुन व्हिडीओ चॅटद्वारे भूतबाधा उतरवण्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या यासंबंधीचे व्हिडीओ नेटवर व्हायरल होत असून, व्हिडीओमधील व्यक्ती इंटरनेटवरुन भूतबाधा उतरवत असल्याचा दावा केला आहे.मोहम्मद आजम उर्फ लिंबूवाले बाबा हि व्यक्ती लिंबूने भूतबाधा उतरवत असल्याचे समजते या बाबाजींच्या आश्रमात पत्रकारांच्या कॅमेराला प्रतिबंध करण्यात आला तसेच आश्रमात एकूण 12 सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले होते.या बाबांचे भक्त केवळ भारतातच मर्यादीत नसून, परदेशातील लोकांची भूतबाधा घालवत असल्याचे सांगितले जात आहे.
पत्रकारांच्या टीमने प्रत्यक्षात जेंव्हा आलेल्या भक्तांसोबतही चर्चा केली, तेव्हा अनेकांनी आपले अनुभव कथन केले. यातील हैदराबादमधील एक भक्त शरीफ यांनी आपण सहावेळा बाबांच्या दर्शनाला असल्याचं सांगितलं. यासाठी त्यांनी 30 हजार रुपये खर्च केले. तसेच अजूनही आठ हजार रुपये दिले. पण अजून त्यांच्या समस्यांचे निराकरण झाले नसल्याचं त्यांनी सांगितलं.भक्तांची सखोल चौकशी केल्यावर , कोणत्याही व्यक्तीला भूतबाध झालेली नसल्याचे समजले. पण बाबाजी भूत हे प्रत्येक भूतबाधा घालवण्यासाठी प्रत्येकी 250 रुपयाच्या हिशेबाप्रमाणे मोठी माया गोळा करत असल्याचे दिसून येत होते.
यावर मानसोपचार तज्ज्ञांची मते जाणून घेतली तेव्हा हा एक मानसिक रोग असल्याचं काही तज्ज्ञांनी सांगितलं, आणि हा आजार बरा केला जाऊ शकतो असेही स्पष्ट केले. त्यामुळे असे मानसिक आजार बरे करण्यसाठी कोणत्याही बाबाची गरज नसते. यावरून या बाबाजीचा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे.पण सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात सोशल मीडियावरुन अनेक थक्क करणारे दावे व्हायरल होत असून देशाच्या दृष्टीने एक चिंताजनक बाब आहे

0 comments:
Post a Comment