Monday, 13 February 2017

नर्सिंग अभ्यासक्रम प्रवेश अडीचशे विद्यार्थिंनींची फसवणूक

बेंगलोर येथील इन्स्टिट्युट आॅफ नर्सिंग येथे प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवुन जवळपास अडीचशे विद्यार्थिनींना प्रत्येकी  दहा हजारांना गंडा घातल्याची घटना नागपूर येथे घडली आहे ,

बेंगलोर येथे नर्सिंगचा अभ्यासक्रम करण्यासाठी लाखो रुपये खर्च येत असताना केवळ दहा हजार रुपयात प्रवेश मिळत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आमिषआला बळी पडत प्रवेशाच्या नावावर दहा हजार रुपये भरले. प्रवेश मिळण्याच्या विश्वासाने हे विद्यार्थी बंगलोर येथील इन्स्टिट्यूला गेले. तिथे आरोपी नवीनकुमार याने परत ८० हजार रुपये जमा करण्यास सांगितले. रुपये जमा न केल्याने परीक्षेत बसता येणार नाही, अशी धमकी दिली.

या प्रकरणी तक्रारीवरुन विद्यार्थिंनींची फसवणूक करणाऱ्या एका महिलेसह दोघांविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरिता कुंभारे रा. उरुवेला कॉलनी आणि नवीन कुमार रा. बेंगलोर असे आरोपीचे नाव आहे.

अशा फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी  पालक व विद्यार्थी यांनी जागरुक होउन कोणत्याही अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापुर्वी त्याची खातरजमा करणे व शासन मान्यता तपासणे आवश्यक असल्याचे मत शिक्षण तज्ञांकडुन व्यक्त होत आहे

0 comments:

Post a Comment