Thursday, 9 February 2017

झोपडपट्टीत राहून यूपीएससी टॉपरचे मोठं यश मिळवल्याचा बनाव करणार्याला अटक

मुंबईच्या घाटकोपरमध्ये दहा बाय दहाच्या खोलीत राहून यूपीएससी परीक्षेत टॉपर आला म्हणून बनाव करणार्या सुरज कणसे या बोगस यूपीएससी टॉपरचा पर्दाफाश झाला आहे. यूपीएससी टॉपर असल्याचा बनाव करणाऱ्या सुरज कणसेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत ,
झोपडपट्टीतल्या कोंदट खोलीत राहून प्रयत्नांच्या जोरावर यूपीएससीसारखी मोठी परीक्षा यशस्वीरित्या पार केल्याने विविध नेत्यांनी सुरजचा सत्कारही केला.

मुंबईतील घाटकोपरचे रहिवासी असलेल्या नवनाथ चव्हाण यांना सुरजने हुशार असल्याचं भासवलं. मोठा अधिकारी होण्याची इच्छा बोलून दाखवल्यावर त्यांनी सुरजचा आर्थिक खर्च उचलण्याची तयारी दर्शवली.
गेल्या 2 वर्षांपासून मदत म्हणून चव्हाण सुरजवर लाखो रुपये खर्च करत होते. सुरजनं बनावट सर्टिफिकेट तयार केली आणि चव्हाणांना दाखवली. त्यामुळे घाटकोपरमध्ये त्याचा मोठा बोलबाला झाला. झोपडपट्टीत राहून मोठं यश मिळवल्याबद्दल घाटकोपरमध्ये त्याचे पोस्टरही लागले.

गेल्या काही दिवसात अधिकृतरित्या चौकशी करता सुरजची ही सर्टिफिकेट बोगस असल्याचं नवनाथ चव्हाण यांच्या लक्षात आलं. त्यांनंतर चव्हाणांनी त्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. अखेर पोलिसांनी सुरजला फसवणुकीबद्दल अटक केली आहे.

0 comments:

Post a Comment