मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आयआरबी कंपनीच्या मार्फत 2004 मध्ये टोलवसूली सुरु झाली. मात्र मागील 10 वर्षात ठरवून दिलेल्या टोल मर्यादेपेक्षा तब्बल 900 कोटी रुपये टोलच्या माध्यमातून जमा झालेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर 2007-08 ते 2016-17 या कालावधीत 1800 कोटी रुपयांची टोल वसूली करण्याची मुभा असताना तब्बल 900 कोटींचा जास्तीचा टोल वसूल करण्यात आला आहे , म्हणजेच आजखेरची एकूण टोलवसूली 2869 कोटी रुपये आहे. सर्वसामान्य वाहनधारक जास्त चौकशी न करता सरळ टोल भरून पुढे निघून जातो , पण माहिती अधिकार कार्यकर्ता विवेक वेलणकर यांनी यासंबंधी जास्तच खोलात जाऊन वरील माहिती खुद्द आयआरबी आणि एमएसआरडीसी यांच्याकडून गोळा केली आहे , आंधळं दळतंय आणि कुत्रा पीठ खातंय अशी अवस्था एमएसआरडीसी ची आहे कारण “आयआरबी आणि एमएसआरडीसीमधील करारानुसार मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवरील एकूण टोलवसूली 2869 कोटी रुपये आहे. ही टोलवसूली 2019 पर्यंत सुरु राहणार आहे. जर 2019 पूर्वी टोलची रक्कम वसूल झाली तर टोलवसूली बंद करण्याची कोणतीही तरतूद या करारामध्ये नाही” अशी माहिती विवेक वेलणकर यांनी दिली आहे.मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आयआरबी कंपनीच्या मार्फत 2004 मध्ये टोलवसूली सुरु झाली. मात्र मागील 10 वर्षात ठरवून दिलेल्या टोल मर्यादेपेक्षा तब्बल 900 कोटी रुपये टोलच्या माध्यमातून जमा झालेत.
व्ही आय पी , सरकारी कर्मचारी , पोलीस , आमदार ,खासदार , मंत्री याना टोल माफ आहे त्यामुळे या कायदेशीर लुटमारीकडे लक्ष्य द्यायला कोणालाच वेळ नाही , तरीपण यावरती तोडगा काढण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच राज्याचे मुख्य सरकारी अभियोक्ता याना विचारणा केल्याचे समजते

0 comments:
Post a Comment