मिरजमधील SBIच्या एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली 30 लाख रुपयांची रोकड दोन अज्ञात तरुणांनी दिवसाढवळ्या, भरवस्तीत, अनेकांच्या साक्षीने लुटली. रोकड घेऊन आलेल्या बलेरो जीपच्या काचा फोडून आतील बॅग घेऊन चोरटय़ांनी काही क्षणात मोटारसायकलीवरुन पलायन केले. बुधवारी दुपारी सराफ रोडवर कापसे हाईटस् मधील एटीएमसमोर हा प्रकार घडला.
दुपारी एक वाजता एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी एसआयएस या एजन्सीचे तीन कर्मचारी जीपमधून (एमएच १० बी ५५८) आले असता
प्रशांत काटकर आणि दिगंबर धुमाळ हे आपल्या जवळील शिल्लक 40 लाखांपैकी दहा लाख रुपये घेऊन एटीएममध्ये भरण्यासाठी गेले , तर चालक बाबासाहेब कांबळे हे उन्हामुळेे गाडी बंद करुन सावलीत बाजुला थांबले यावेळी
दोन अज्ञात तरुणांनी एकाने गाडीच्या उजव्या बाजूने येऊन चालकाच्या मागील बाजूस असलेली काच फोडून आतील बॅग ताब्यात घेतली. तर दुसऱया तरुणाने लगतच मोटारसायकल सुरू ठेवली होती. क्षणाचाही अवधी न लावता या दोघांनी 30 लाख रुपये असलेली बॅग घेऊन मोटारसायकलीवरुन पलायन केले.
दोघा चोरांचे शूटिंग एटीएम समोरच असलेल्या शॉपच्या सीसीटीव्ही पॅमेऱयात झाले आहे.
रोकड घेऊन आलेल्या गाडीसोबत दिगंबर धुमाळ, प्रशांत काटकर आणि चालक बाबासाहेब कांबळे हे एजन्सीचे तीन कर्मचारी होते. पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी या तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांची स्वतंत्रपणे चौकशी केली. त्यामधून काय निष्पन्न झाले, हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान, लाखो रुपयांची रोकड वाहतूक करताना वापरण्यात आलेल्या बलेरो गाडीला कोठेही लोखंडी जाळी दिसून आली नाही. तसेच सोबत गनमेनही नव्हता , याशिवाय गाडीत 30 लाख रुपयांची रोकड असताना आणि भरवस्तीत रस्त्याकडेला गाडी उभी असताना यामध्ये एकही कर्मचारी न थांबता तिघेही बाहेर थांबल्याने याबाबत शहरात तर्कवितर्क लढविले जात होते.
0 comments:
Post a Comment