Tuesday, 6 June 2017

पोलीस आणि पत्रकार यांच्या समन्वयाने समाजाला अधिक चांगली सेवा देता येईल- पोलीस अधीक्षक संजय मोहिते

लक्ष्मण कांबरे
हेरले/ प्रतिनिधी दि.६/६/१७

                                                       
      पोलीस आणि पत्रकार यांच्यात समन्वय असेल तर समाजाला अधिक चांगली सेवा देता येईल असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी व्यक्त केले. कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टरस् वेलफेअर असोसिएशनतर्फे त्यांनी कोल्हापूरचा पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांची सदिच्छा भेट घेण्यात आली .
यावेळी उपस्थित पत्रकारांशी जिल्हा पोलीस प्रमुख संजय  मोहिते यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ग्रामीण पत्रकार हे अनेक वर्षे कार्यरत असल्यामुळे ते तपास कामात पोलिसांना चांगले सहकार्य करू शकतात. अवैध धंदे बंद करण्याबरोबरच गावातील जातीय तेढ, पूर्व वैमनस्य, याबाबत पोलिसांना माहिती देवून कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यात पत्रकार मदत करू शकतात. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून प्रसिद्धी माध्यमांकडे पाहिले जाते. त्यामुळे पत्रकारीतेमधिल अलिखित नियमांचे उल्लंघन न करता आणि पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना  असणारी प्रशासकीय बंधने लक्षात घेऊन सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.  
                 यावेळी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टरस् वेलफेअर असोसिएशनतर्फे अध्यक्ष सुधाकर निर्मळे व उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी यांनी नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
           पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे म्हणाले की, जिल्ह्यातील बारा तालूक्यातील विविध दैनिकाचे पत्रकार संघात आहेत. ते पत्रकारितेच्या माध्यमातून निस्पृह समाजसेवा करतात तसेच त्यांचे पोलीस दलास सदैव सहकार्य असते व राहील. पोलीस दल व पत्रकारीता या दोन्ही क्षेत्राच्या परस्पर सहकार्याने समाजास घातक ठरणाऱ्या कार्यास हद्दपार करणेस प्रयत्नशील राहूया असे मत व्यक्त केले.
      या प्रसंगी संघाचे उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, खजानिस पोपटराव वाकसे, कौन्सील मेंबर सुरेश पाटील, सुरेश कांबरे, सहसचिव लक्ष्मण कांबरे सलीम खतीब, कोअर कमिटी सदस्य डॉ. टी. एस. पाटील, डॉ. निवास वरपे, भाऊसाहेब सकट, प्रा. भास्कर चंदनशिवे, जिल्हा उपाध्यक्ष अवधूत आठवले, संतोष सणगर, तालुका अध्यक्ष नंदकुमार कांबळे, दगडू माने, सचिन शिंदे, अनिल तोडकर ,सुधाकर पाटील, संतोष तारळे, दिपक जाधव, धनाजी गुरव, मोहन सातपुते, एन.जी. पोवार,मिलींद बारवडे, आदी पदाधिकाऱ्यांस बहुसंख्येने पत्रकार व क्राईम डायरीचे मुख्य प्रतिनिधी ज्ञानराज पाटील उपस्थित होते.

       फोटो - नूतन जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहिते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतांना अध्यक्ष सुधाकर निर्मळे उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी शेजारी सुरेश पाटील, पोपटराव वाकसे, सुरेश कांबरे आदि.
( छाया एन. कांबळे पन्हाळा)

0 comments:

Post a Comment