हल्ली कार चोरीला जाण्याचे प्रमाण जास्त वाढत आहे, पण चोरीला गेलेली कार परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते व पोलिसांना विचारले तर तपास सुरू आहे हे पठडीतले उत्तर मिळते पण याला अपवाद अशी एक घटना नुकतीच घडली आहे.
बहिरेवाडी येथील डॉ अभिजित जाधव यांच्या सतर्कतेमुळे एका व्यक्तीला त्याची चोरीला गेलेली कार पुन्हा मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की इचलकरंजीतील दादासो सुतार यांची मारुती 800 कार नरसोबाची वाडी येथुन दि. 21 मे 2017 रोजी चोरीला गेली होती त्याबाबतीत त्यांनी तशी तक्रार दाखल केली होती.
बहिरेवाडी येथील डॉ. अभिजित जाधव हे जोतिबा शासकीय रुग्णालयात 108 अॅम्ब्युलन्सवर कार्यरत आहेत, ते रोजप्रमाणे बहिरेवाडी ते जोतिबा ड्युटीवर जात असताना त्यांना केखले गावाजवळ एक बेवारस मारुती 800 कार निदर्शनास आली व त्या अनुषंगाने त्यांनी स्थानिकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण माहिती मिळाली नाही.
सलग दोन दिवस हि बेवारस कार त्याच जागी उभी पाहून त्यांना शंका आली व सदर कारची पोलिसांना माहिती दिली पण पोलिसांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. परत दि. 24 मे रोजी कार जैसे थे पाहून मग त्यांनी सोशल मीडियावर व्हॉटस अपच्या माध्यमातून सर्व ग्रुपमध्ये बेवारस कारची पोस्ट पाठवली व मालकाला माहिती देण्यासाठी आवाहन केले, अवघ्या 4 तासात त्यांच्या प्रयत्नांना यश आले व गडकोट दुर्ग प्रेमी या ग्रुपवर त्यांना कार मालक दादासो सुतार रा. कलानगर, इचलकरंजी यांनी संपर्क साधला, नंतर कारची ओळख पटवून व पोलिसांना सुचित करून गाडी ताब्यात देण्यात आली.
हि कार चोरीला गेले नंतर कदाचित पेट्रोल संपल्यावर चोर केखले गावाजवळ सोडून गेले असावेत असे वाटते.
आपली चोरीला गेलेली कार डॉ अभिजित जाधव यांच्या सतर्कतेमुळे व सोशल मीडियाच्या वापरामुळे त्यांना लगेचच परत मिळाली व याबद्दल सुतार यांनी डॉ. जाधव यांचे शतशः आभार मानले.
तसेच घटनास्थळावरून व परिसरामधिल नागरिकांकडून डॉ. अभिजित जाधव यांचे कौतुक केले जात आहे.
सोशल मीडियाच्या विधायक वापरामुळे चोरीला गेलेली कार परत मिळण्याची ही कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.
Sunday, 28 May 2017
- Home
- Unlabelled
- चोरीला गेलेली कार मिळाली WhatsApp मुळे
चोरीला गेलेली कार मिळाली WhatsApp मुळे
Posted By CRIME DIARY
On 04:35
0 comments:
Post a Comment