.
'तरुण भारत' चे उंब्रजचे पत्रकार प्रवीण कांबळे यांना तासवडे टोलनाक्यावर टोल वसुली करणाऱ्या गुंड कर्मचाऱ्यांनी मारहाण केली.
प्रवीण कांबळे उंब्रजहुन कराडकडे जात असताना तासवडे टोलनाक्यावर मुजोर टोल नाका कर्मचारी एका कुटुंबाला मारहाण करत होते.प्रवीण यांनी हा प्रकार बघता क्षणी तो खाली उतरला. व डोळ्यापुढे सुरू असलेला प्रकाराचे फोटो काढू लागला, तेव्हा टोलनाका कर्मचाऱ्यांनी थेट त्यालाही मारहाण करायला सुरुवात केली.त्याचा मोबाईल काढून घेतला व थेट मारहाण केली .
घडला सारा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद आहे
हि घटना कर्तव्यदक्ष असणाऱ्या सातारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या कार्यक्षेत्रात घडली आहे
संबंधित टोल कंपनी, त्याचे मालक-चालक व टोल कर्मचाऱ्यांवर
"नव्या पत्रकार हल्ला विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे" अशी सर्व पत्रकारांनी मागणी केली आहे.
स्त्रोत - जिल्हा पत्रकार संघ WhatsApp group
क्राईम डायरीच्या वतीने पत्रकारावरील भ्याड हल्ल्याचा व मारहाणीचा तीव्र निषेध !
0 comments:
Post a Comment