इचलकरंजी कोर्टात साक्ष देण्यासाठी आलेल्या रिटायर्ड डीवायएसपी प्रदीप भोसले यांच्या खासगी कार गाडीत अंबर दिवा, पोलिस अधिकार्यांची स्टीक आणि ‘पोलिस’ असा बोर्ड आढळून आल्याने खळबळ उडाली. हिंदुत्ववादी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी गावभाग पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी पंचनामा करून चारचाकी गाडीसह संशयित वस्तू ताब्यात घेतल्या.
पोलिसांनी गाडीच्या नंबरवरून मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ही गाडी लढ्ढा नामक व्यक्तीच्या नावावर असल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे त्याच्यावर मटका आणि पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
त्यामुळे पोलीसांची साधने वापरून या गाडीचा गुन्ह्य़ात वापर झाला जातो की काय अशी उपस्थित नागरिकांमध्ये चर्चा होती.
पोलीस येईपर्यंत दरम्यानच्या काळात रिटायर्ड डीवायएसपी भोसले यांनी ही गाडी आपली असल्याचे सांगून कोर्टातून गाडी नेण्यासाठी प्रयत्न केला. संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्ते तर त्यांच्या गाडीच्या पुढे झोपले. त्यामुळे भोसले यांना जाग्यावरून गाडी हलवता आली नाही. यावेळी भोसले व काही कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली.
पोलीस अधिकाऱ्यांना खाजगी गाडीवर दिवा व पोलीस बोर्ड वापरण्याची बंदी आहे तरीही कोल्हापूर जिल्ह्यात राजरोसपणे कोणीही उठून दिवा व पोलीस बोर्ड लावतात हे आता स्पष्ट झाले आहे, पोलिस प्रशासनाने याची त्वरीत दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Sunday, 7 May 2017
- Home
- Unlabelled
- रिटायर्ड डीवायएसपीला अंबर दिवा व पोलीस बोर्ड वापरणे पडले महागात, गाडी जप्त
रिटायर्ड डीवायएसपीला अंबर दिवा व पोलीस बोर्ड वापरणे पडले महागात, गाडी जप्त
Posted By CRIME DIARY
On 09:41
0 comments:
Post a Comment