को्ल्हापूर :मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील व शाहूपुरी पोलीस स्टेशनजवळील महालक्ष्मी चेंबर्स येथील पूजा एंटरप्रायजेस या चष्मे तयार करणार्या दुकानात चोरट्यांनी रविवारी रात्री चोरी केली.चष्म्याच्या काचा कटिंगचे व चष्मे तयार करण्याचे सुमारे एक लाखाचे ऑटोमॅटिक मशीन पळवले. याबाबत दुकानमालक विजय उब्रीयांनी (वय ४८, रा. कारंडे मळा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.हे मशीन माहितगार चोरट्यानीच पळवले असावे .महालक्ष्मी चेंबर्समध्ये चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे कारण हा वर्दळीचा परिसर असून समोरील रिक्षा स्टॉप वर वाहतूक पोलीस २४ तास तैनात असतात, तसेच पोलिसांची गस्तही असते तरीपण चोरटयांनी चोरी करून पोलिसांना आव्हान दिले आहे
0 comments:
Post a Comment