प्रतिनिधि - मयूर कडूसकर सा.क्राईम डायरी
बँक म्हटले कि ,पैशाची देवाण घेवाण आली,ठेवी आल्या,कर्ज वाटप आली,अशा अनेक प्रकारच्या सुविधा बँका मार्फत पुरविल्या जातात.
प्रत्येकाला पैशाची कोणत्या ना कोणत्या कारणाने गरज लागते.
कोणाला गाडी खरेदी साठी ,घर खरेदी साठी,व्यापारासाठी इ. कामासाठी प्रत्येकाला पैशाची गरज लागते.
पण आज कालच्या आधुनिक युगामध्ये सर्व काही ऑनलाइन झाले आहे.लोकांना त्या बद्दल काही माहित नसते.कर्ज काढण्यासाठी प्रत्येक बँकाची ठराविक प्रक्रिया असते.पण त्या प्रक्रिये बद्दल कोणास काही ठाऊक नसते . अशा वेळेस माणसे एजन्ट च्या दारी जातात. एजन्ट म्हणजे दुसरा कोणी नसून बँक प्रक्रिये बद्दल माहित। असणारा.
एजन्ट कडून बँकांच्या मॅनेजरच्या ,कर्ज मंजूर करणाऱ्या बॉडी च्या ओळखीचा मोठं मोठ्या बतवण्या केल्या जातात. मी तुमचे त्वरित कर्ज मंजूर करतो ,वरच्या साहेबाना अमुक अमुक टक्के द्यावे लागतील अशा भूलथापा एजन्ट कडून मारल्या जातात.
बँकेत ओळख आहे असे भासवत कर्ज मंजुतीकरिता ३ टक्के ते १५ टक्के पर्यंत कमिशन एजन्ट कडून मागितले जाते.
तसे बघायला गेले तर कोणतीही बँक कोणत्याही एजन्ट ला अधिकृत पण नेमत नाही.
एजन्ट हा कर्ज ची फाइल स्वीकारतो व जशी च्या तशी बँकेच्या सेल्स एक्झिकिव्ह कडे देतो,त्या नंतर तो रीतसर फाइल बघून कर्ज मंजुरी करीता देतो. त्यात जर कर्ज मंजूर झालेसच तर कमिशन एजन्ट कडून मागितले जाते. खरेतर त्या एजन्ट चा त्यात काही रोल नसतो.
आजकाल सर्रास पण बँकांच्या नावाचा वापर हा एजन्ट च्या व्हिजिटिंग कार्ड वर केला जातो. बँकांच्या नावाखाली आपले नाव छापून पैशाची लूट सामान्य जनते कडून केली जाते.
एजन्ट शिवाय काम होणार नाही असा भ्रम सामान्य लोकामध्ये आहे.पण तसे काही नसून लोकांनी बँकांच्या प्रक्रिये बददल जाणून घेतले पाहिजेत.कोणत्याही एजन्ट च्या भूलथापा ना बळी पडता कामा नये.
एजन्ट कडून होणाऱ्या अशा प्रकारच्या लुटी ला कुठेतरी थांबवले पाहिजे. त्यांच्या वर कायदेशीर निर्बंध आणले पाहिजे.सर्व बँकांनी मिळून असा आदेश काढला पाहिजे कि कोणीही बाहेरचा व्यक्ती त्यांच्या नावाचा गैरवापर करता कामा नये.तसे आढळल्यास त्याच्यावर रीतसर कारवाई बँक मार्फत करण्यात यावी ,तरच अशा गोष्टीला आळा बसेल.
0 comments:
Post a Comment