Tuesday, 11 April 2017

तरुण पिढीला सावकारकीची चटक -पैसे कमावण्यासाठी वाममार्गाचा वापर -कायद्याचा धाकच नाही!

प्रतिनिधी - मयूर कडूसकर सा.क्राईम डायरी

       आज कालच्या तरुणाईला कमी कष्टात जास्तीत जास्त पैसे कमवण्याची हाव झालेली आहे. त्यासाठी आजची तरुणाई गैर मार्गाचा वापर करीत असल्याचे दिसून आले आहे.सावकारी व्याजाने पैसे वाटायचे त्या व्याजावर आपला मासिक खर्च व चैनी करायची, वाढदिवसाला डिजिटल बोर्ड लावायची, पंटरांना दारू पाजून डॉल्बीवर नाचवायचं, हातात सोन्याचे कडं, गळ्यात जाड सोनसाखळी, पाचही बोटात सोन्याच्या अंगठ्या, फिरायला बुलेट अशी तरुणाईची मन:स्थिती झाली आहे.
        कुठे तरी चांगल्या ठिकानी नोकरी करून अथवा व्यवसाय करून पैसे कमवायचे हे आजच्या तरुणाईला नकोसे झाले आहे.
          कुणा एकाला हाताशी धरून ५०००० /- ते १०००००/- पर्यंत रक्कम १० ते २० टक्केने वाटायची व त्याच्या व्याजावर चैनी करायची हि परंपरा रुजू होत चाललेली आहे. या परंपरेला वेळीच रोखले गेले पाहिजे .कुणाकडून व्याजाची रक्कम मागे पुढे झाली तर त्याला धमकी द्यायची ,घरातील वस्तू उचलून आणायची, गाडी ओढून आणायची असा प्रकार सर्रास सूरु आहे.
         त्यातही स्थानिक पोलीस ठाण्यात यांचे सु संबंध, सामाजिक कार्यकर्ते नाही तर पोलीसमित्र म्हणून कायम वावर त्यामुळे यांच्याविरुद्ध तक्रार द्यायला कोण धजावणार ?

             पुढे गँगस्टर व माफिया होणाऱ्या या तरुणांना वेळीच आवर घालण्यासाठी पोलिसांनी खासगी सावकारकीच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

0 comments:

Post a Comment