Tuesday, 25 April 2017

भोगावती कारखाना निवडणूक निकालावरून हॉटेलमध्ये बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडल्या

प्रतिनिधी - संदीप पोवार

नुकतेच झालेल्या भोगावती कारखाना निवडणूक निकालावरून भांडण काढून काचेचा ग्लास कपाळावर मारून व डोक्यात बिअरच्या बाटल्या फोडून एकाने जखमी केलं आहे.
        याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापुरातील हॉटेल पाटलाचा वाडा (कलेक्टर अॉफिस जवळ) येथे फिर्यादी शिवराज रमेश सावंत ( रा. कमला काॅलेज जवळ  टाकाळा) हा मित्रा सह बिअर पित असता त्याला मोबाईलवर कॉल आला व संबंधिताशी भोगावती कारखाना निवडणूक निकाल हा पी.एन.पाटील यांच्या बाजूने लागला आहे, त्यांचे पॅनेल एकहाती निवडून आले आहे असे संभाषण करत असताना हॉटेलमध्ये आलेल्या अमित शहा ( पत्ता माहिती नाही) याला राग आला व त्याने बातमी वरून भांडण काढून काचेचा ग्लास व शिवराज याच्या डोक्यात बिअरच्या चार बाटल्या फोडल्यानंतर डोक्यातून मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो जमिनीवर पडला. त्यानंतर काही तरुणांनी रिक्षातून शिवराज यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले.शिवराज सावंत गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हाॅटेल पाटलाचा वाडा मधील या मारहाणीचा गुन्हा शाहूपुरी पोलिसांत दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक सुभाष कांबळे करत आहेत.

0 comments:

Post a Comment