प्रतिनिधी - अतिश लादे
•सध्या चर्चेत असलेल्या वारणा परिसरातील पोलीस अधिकार्यांकडे सापडलेले ९ कोटी रू• आणि कायद्याचे रक्षक समजले जाणारे पोलिस खातेच जर हे असे काम करत असेल तर खाकी वर्दिच्या आत काळी कारस्थाने करणार्या पोलीस अधिकारी वर्गावर विश्वास ठेवायचा तरी कसा हा मोठा प्रश्न गंभीर झाला आहे, एकिकडे देशासाठी बलिदान देणारे करकरे, कामटे साहेंबासारखे अधिकारी यांच्यासारख्यांचा आदर्श पोलीस खात्यासमोर असून देखील जर ते घेवू शकत नसतील तर सर्वसामान्य जनतेची किती लूट होत असेल हा प्रश्नच पडला आहे, अशा अधिकारी वर्गामुळे प्रामाणिक पणे काम करनारे अधिकारी यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोण देखील समाजाचा बदलत चाललेला आहे, यासाठी प्रशासनाने अशा खात्यांतर्गत गुन्हेगारी रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलावी अशी जनतेतून मागणी होत आहे•
0 comments:
Post a Comment