कोल्हापुरात पोलीस महानिरीक्षक कार्यालयजवळील गोकुळसमोरील नाना नानी पार्कच्या गेटसमोर भर दुपारी दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात गुंडांनी एकावर हॉकी स्टीकने हल्ला चढवला. यामध्ये संतोष कोळी आणि त्यांचा लहान मुलगा जखमी झाले असून त्यांच्या आय 20 कारची प्रचंड तोडफोड झाली आहे.
कोल्हापुरात ताराबाई पार्क परिसरात आज दुपारी मुलांना शाळेतून आणण्यासाठी संतोष कोळी ( वय ३६ रा लाईन बझार ,कोल्हापूर ) हे आपल्या आय-20 क्रमांक MH09 GU 3567 मधुन गेले होते. पोलीस महानिरीक्षक कार्यालयाजवळच्या नाना नानी पार्कच्या गेटसमोर ते आले असता दुचाकीवरून आलेल्या अज्ञात गुंडांनी त्यांच्या गाडीवर हॉकी स्टीकने हल्ला चढवला .
अज्ञात हल्लेखोरांनी पुढील व पाठीमागील बाजूची आणि त्यांच्या बाजूच्या काचेवरही हल्ला केला. सुदैवाने यावेळी समोरून पोलीस गाडी आल्याने ते बचावले. पोलिसांनी या गुंडांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्रे ते दुचाकीवरुन सुसाट पसार झाले , पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.
यापुर्वीच्या बातमीतुन सुसाट वाहनचालकांवर पोलीसंचा वचक हवा असे आवाहन क्राईम डायरीच्या वतीने करण्यात आले होते , वाहनांचा वापर गुन्ह्यांसाठी होणे हे चिंतेचे कारण बनले आहे
0 comments:
Post a Comment