क्राईम डायरी प्रतिनिधी संदीप पोवार
कोल्हापूर शहरात विना नंबरप्लेट वाहने कारवाईअभावी सुसाट फिरत आहेत , शहर वाहतूक नियंत्रण शाखेने याची दाखल घेऊन तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे , कारण शहरात दिवसेंदिवस चेन स्नॅचिंग , चोरी , घरफोडी , वाहन चोरी , अपघात करून पळून जाणे असे गुन्हे विना नंबरप्लेट वाहनांचा आधाराने वाढत आहेत , भारतीय वाहन नियम कायद्याची हि पायमल्लीच आहे , कायद्याची अंमलबजावणी न करणे म्हणजे कर्तव्यात कसूर करण्यासारखेच आहे असे मत नागरीकातून व्यक्त होत आहे
याबरोबरच फॅन्सी नंबरप्लेट , ट्रिपल सीट , अल्पवयीन मुलांनी विनापरवाना वाहन चालवणे , बुलेट व यामाहा च्या सायलेन्सर मध्ये बदल करून फटाक्याचा आवाज काढणे , कर्णकर्कश हॉर्न वाजवणे असे प्रकारदेखील वाढले आहेत , या प्रकारांना देखील पायबंद बसलाच पाहिजे

0 comments:
Post a Comment