Saturday, 28 January 2017

चेक न वटल्याप्रकरणी एकास ३ महिन्यांची शिक्षा

क्राईम डायरी कोल्हापूर प्रतिनिधि - ज्ञानराज पाटील

व्यापार्याला दिलेला २० हजार रुपयांचा चेक न वटल्याप्रकरणी अशोक पाटील { रा चंदूर ता हातकणंगले } यास प्रथम वर्ग न्यायाधीश व्ही व्ही जोशी यांनी ३ महिने साधी कैद व ४० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली
या खटल्यात फिर्यादीच्यावतीने ॲडव्होकेट सुधीर सुतार व दत्तात्रय सावेकर यांनी काम पाहिले , या केसची अधिक माहिती अशी ,
  शिरोली येथील विष्णुदास झंवर यांचा दगडी कोळसा विक्रीचा व्यवसाय आहे , त्यांच्याकडून अशोक पाटील यांनी विटभट्टीसाठी दगडी कोळसा खरेदी केला होता , त्यापोटी २० हजारांचा चेक दिला होता  ,झंवर यांनी  चेक बँकेत भरल्यावर तो वटला नाही म्हणून झंवर यांनी अशोक पाटील विरोधात न्यायालयात फिर्याद दाखल केली होती ,
या खटल्यात ॲडव्होकेट सुधीर सुतार व दत्तात्रय सावेकर यांनी फिर्यादीच्या वतीने मांडलेला युक्तीवाद ग्राह्य मानत न्यायाधीशांनी पाटील याना वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली


2 comments:

  1. चांगली अमल बजावणी आहे

    ReplyDelete
  2. प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद

    ReplyDelete