Friday, 27 January 2017

सनी पोवार पोलीस कोठडी मृत्यू प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षकासह तिघां पोलिसांना जन्मठेप व दंड

क्राईम डायरी प्रतिनिधी - संदीप पोवार

बसवर दगडफेक केली म्हणून पोलिसांनी अटक केलेला सनी पोवार हा  पोलीस ठाण्यातील  कोठडीत असताना मृत्यू झाल्यामुळे पेठवडगाव पोलिसांवरच भारतीय दंडविधान कलम 302 प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. 23 ऑगस्ट 2014 रोजी हि घटना घडली होती सनी पोवारवर सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल केला होता , त्याला पोलीस कोठडीत मारहाण झाली त्यामुळे   त्याच्या पोटात दुखू लागल्यामुळे पोलिसांनी तातडीने 'सीपीआर'मध्ये दाखल केल्यानंतर  डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

या खटल्यात आज सहाय्यक पोलिस निरीक्षकासह तिघां पोलिसांना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मपेठ आणि प्रत्येकी 15 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सहायक पोलिस निरीक्षक सजीव पाटील, सहायक फौजदार बबन शिंदे आणि पोलिस नाईक धनाजी पाटील या तिघांना याच्या मृत्यूस कारणीभूत धरत  सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांनी ही शिक्षा सुनावली.याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अशोक रणदिवे यांनी काम पाहिले. तर आरोपीतर्फे हर्षद निंबाळकर, एम.डी. सुर्वे, शिवाजीराव राणे आदी वकिलांनी काम पाहिले.

0 comments:

Post a Comment