Monday, 30 January 2017

भवानी मंडपात महालक्ष्मीच्या भाविकांना ओटी विकण्यावरून विक्रेत्यांमध्ये हाणामारी

भवानी मंडपात महालक्ष्मी दर्शनाला येणाऱ्या भाविकांना ओटी विकण्यावरून विक्रेत्यांमध्ये नेहमीच चढाओढ असते. या ठिकाणी विक्रेत्यांच्या  गटात ओटी विक्रीतून वारंवार या ठिकाणी वादावादी सुरू असते.शनिवारी रात्री विशाल गणेश लोखंडे (वय 29, रा. संभाजीनगर) याला मारहाण करण्यात आली. गिर्‍हाईकाला बोलावण्याचा  कारणावरून गणेश लोखंडे आणि कासीम (पूर्ण नाव माहित  नाही) यांच्यात वादावादी झाली. कासीम याने आपल्या  साथीदारांना भवानी मंडप परिसरात बोलावून चार ते पाच जणासह  विशाल लोखंडे यास बेदम मारहाण केली.या संदर्भात फिर्याद  जुना राजवाडा पोलिसांत दाखल झाली आहे. विशाल लोखंडे यास मार लागल्याने सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले.

0 comments:

Post a Comment