Monday, 30 January 2017

एस. टी. बसमध्ये चढताना मुंबईच्या महिला भाविकाची पर्स लंपास



सीबीएस बसस्थानक परिसरात एस. टी. बसमध्ये चढताना शालिनी विनय सुरवाडे (वय ६० , रा.  कल्याण वेस्ट, मुंबई) यांची पर्स रविवारी दुपारी अज्ञात चोरट्याने लंपास केली.या पर्समध्ये मतदान ओळखपत्र, एटीएम व रोख १५ हजार रुपये होते.कोल्हापुरात महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या शालिनी सुरवाडे रविवारी दुपारी सीबीएस  बसस्थानक परिसरात आल्या. कोल्हापूर ते पुणे एस. टी. बसमध्ये बसताना गर्दीचा फायदा घेत अज्ञाताने पर्स हिसकावली. ही बाब त्यांना समजताच त्या बसमधून परत  खाली उतरल्या. गर्दीमध्ये त्यांची पर्स कोणी हिसकावली, हे समजून आले नाही.पर्स चोरीला गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याने हिसकावलेल्या पर्समध्ये शालिनी सुरवाडे यांचे आधारकार्ड, एटीएम कार्ड, ओळखपत्र आणि रोख 15 हजार रुपये होते. त्यांनी याबाबत शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली
या परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने सलग रोज होणार्‍या चोरीच्या  घटनांमुळे प्रवासीही त्रस्त व भयभीत  झाले आहेत.

यापूर्वीही  शनिवार (दि. 28) रोजी विजया राजेंद्र कोरडे (वय 53, रा. अष्टविनायक चौक, सांगलीवाडी) यांची , दोन दिवसांपूर्वी सुनीता सतीश पाटील (वय 53, रा. बुधवार पेठ, कऱ्हाड, जि. सातारा) यांची तर महिन्यापूर्वी कऱ्हाड येथील प्राध्यापिका मेघा सुभाष कदम (वय 30, रा. खोडशी, ता. कऱ्हाड, जि. सातारा) यांचीही पर्स
बसस्थानक परिसरातून अशाच प्रकारे लंपास झाली आहे 

0 comments:

Post a Comment