तरुण पिढी तंबाखूच्या धुरात आणि गुटख्याच्या पुडीत पुरती हरवली आहे. इतकेच नव्हे, तर धूम्रपानाचे व गुटख्याचे धोके लक्षात घेऊनही व्यसन सोडण्याची त्यांची अजिबात इच्छा नाही. शहरातील तरुणांबरोबरच ग्रामीण भागातील तरुणही यात मागे नसल्याचे केलेल्या पाहणीतून उघड झाले आहे. आतातर हुक्का बार हा नवीनच प्रकार कॉलेजच्या तरुणांमध्ये फेमस झाला आहे ,धूम्रपान सोडण्याची अजिबात इच्छा नसणाऱ्यांचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक 60 ते 70 टक्के असल्याचेही आढळून आले आहे.धुराच्या व पुडीच्या वाटेवर निघालेल्या तरुणांची संख्या इतकी जास्त आहे, की अजून 10 वर्षांनी विकसनशील देशांतील दहा मृत्यूमागे सात मृत्यू केवळ तंबाखूच्या सेवनाने होणार आहेत. तरुण पिढी तंबाखू, सिगारेट, गुटखा आणि इतर व्यसनांच्या आहारी गेल्याची मोघम वक्तव्य केली जात होती. मात्र, त्याबाबत काही निष्कर्ष काढण्यासाठीची आकडेवारी अद्याप नाही , पण
देशातील एकतृतीयांश (35 टक्के) तरुण तंबाखू आणि तंबाखूपासून तयार होणाऱ्या तत्सम पदार्थांचे सेवन करीत असल्याचा अंदाज आहे
तरुणांवर पालकांनी , शिक्षकांनी व पोलीसांनी त्यांचे मानसिक प्रबोधन करण्याची गरज आहे
तंबाखूची व गुटख्याची चटक एकदा का लागली, तर ती सोडणे किती कठीण असते, सिगारेटच्या व्यसनामुळे जवळच्या कोणाला तरी हृदयविकाराचा झटका आलेला असतो; अतिधूम्रपानामुळे जवळच्या मित्रालाच कर्करोग झाल्याचे निदान होते किंवा कधीतरी कुटुंबातील मोठी व्यक्ती झाडते , त्यानंतर “१ जानेवारीपासुन पुर्ण बंद , उद्यापासून बंद , ओठाला सिगारेटचा स्पर्श करायचा नाही,’ असा असा ठाम निर्धार करतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांना तल्लफ आली की काही सुचत नसल्याचे आढळून आले आहे.
“हृदयविकार, कर्करोग आणि जे काही व्हायचे ते होईल, तेव्हा पाहता येईल,’ असा विचार करून सिगारेटच्या पाकिटावरील इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून, जाणत्यांचे चार प्रेमाचे सल्ले एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडण्यातच अनेकांना धन्यता वाटते. महाराष्ट्रात तर “धूम्रपान सोडायचे नाही,’ असा निर्धार करणारे सर्वाधिक धूम्रपानप्रेमी असून, त्याचे प्रमाण 60 टक्के आहे. जे इतर राज्यांपेक्षा सर्वाधिक आहे.
व्यसन सोडणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प
तंबाखू आणि तत्सम पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण राष्ट्रीय पातळीपेक्षा तर महाराष्ट्रात अधिकच आहे. राज्यात नियमित धूम्रपान करणाऱ्यांपेक्षा तर नियमित गुटखा सेवन करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. नियमित सेवन करणाऱ्यांनी संपूर्णपणे या व्यसनाचा नाद सोडण्यासाठी निकोटेक्स हे च्युईंगम वापरण्याचे प्रमाण केवळ अत्यल्प आहे
खुप चुकीच होत चाल आहे तरुण पीडी च
ReplyDeleteप्रतिसादाबद्दल धन्यवाद !
ReplyDelete