Friday, 27 January 2017

आयाराम गयाराम व गुन्हेगारांचे इनकमिंग


महापालिका आणि जिल्हा परिषद , पंचायत समित्यांसाठी राज्यभर युत्या-आघाड्यांची जुळवाजुळव सुरू असतानाच अनेक आयाराम गयाराम व गुन्हेगारांचे  इनकमिंग सुरु आहे , आता सध्या सगळीकडेच आयाराम गयाराम दिसतात. त्याशिवाय सत्तेवर स्वार होण्यासाठी लोकांच्या असंतोषाचा वापर सगळेच पक्ष करत आहेत जे मूळ कार्यकर्त्यांना अंत्यंत घातक आहे 

हरियानात एका आमदाराने एका दिवसात दोनदा पक्ष बदलला. त्यांचे नाव राम गौर असे होते. राम गौर आले, राम गौर गेले यावरून पक्षांतरास आयाराम - गयाराम असे म्हटले जाऊ लागले.

सध्या सुरू असलेल्या गुन्हेगारांच्या इनकमिंगने पक्षांची प्रतिमा मलिन होत आहे ,सध्या कुणालाही प्रवेश दिला जात असून गुन्हेगार, भ्रष्टाचा-यांना प्राधान्य दिले जात आहे सध्या सुरू असलेले सारे प्रवेश वैयक्तिक स्वार्थासाठी सुरू असून पद, पैसा मिळवण्यासाठीच सारे सत्ताधार्यांकडे येत आहेत , नवनवीन अभद्र युत्या आणि आघाड्या जन्माला येत आहेत मात्र  यामुळे सर्वसामान्य  पिढीनं पिढी पक्ष्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातात शेवटी फक्त खळं अन पोस्टर शिवाय काहीही राहणार नाही 

बाबासो जाधव 
संपादक क्राईम डायरी 

0 comments:

Post a Comment