कोल्हापूर प्रतिनिधी:
कोल्हापूरात मुक्त सैनिक वसाहतमधील रत्नाकर बँकेच्या (Rbl) एटीएम सेंटर गॅसकटरने कापून सुमारे ८ लाख ३३ हजाराची रक्कम चोरी केल्याची घटना आज उघडकीस आली. घटनास्थळी शाहुपूरी पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाने ठसे तज्ञ तसेच श्वानामार्फत तपास मोहीम राबविली, पण चोरटयांचा माग लागला नाही.
ताराबाई पार्क परिसरातील कावळा नाका ते तावडे हॉटेल रोडवरील रत्नाकर बँकेचे () चे एटीएम मशिन मुक्त सैनिक वसाहत येथे आहे. कर्मचाऱी नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कॅश भरण्यासाठी आले होते. त्यांना एटीएम मशिन फोडलेले दिसले. त्यांनी बँक व्यवस्थापक महादेव चिकुर्डेकर यांना कळविले. या वेळी एटीएम कंपनीचे प्रतिनिधी विनय हसबनीस आले. त्यांनी पोलिसांत याबाबत तक्रार दिली.
दरम्यान, दरोडेखोरांनी रेकी करुन मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एटीएम सेंटरमधील मशिन गॅस कटरने थेट कॅश ठेवलेली डावी बाजू उभी कापली. त्यातील शंभर, पाचशे व दोन हजार रुपयांच्या ८ लाख ३३ हजाराच्या नोटा चोरटयांनी लंपास केला. तर गॅस कटरच्या ठिणग्या उडाल्याने मशिन जळाल्याने त्याची दूर्गंधी सुटली होती. हा प्रकार कोणाच्या लक्षात येवू नये म्हणून चोरटयांनी बाहेर पडताना त्यांनी पुन्हा शटर बंद करून घेतले असल्याची माहीती पोलिसांनी दिली. या चोरीच्या तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून शहरातील सर्व मार्गावरील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Wednesday, 2 August 2017
- Home
- Unlabelled
- रत्नाकर बँकेच्या (Rbl) एटीएम सेंटर गॅसकटरने कापून सुमारे ८ लाख ३३ हजाराची रक्कम चोरी
रत्नाकर बँकेच्या (Rbl) एटीएम सेंटर गॅसकटरने कापून सुमारे ८ लाख ३३ हजाराची रक्कम चोरी
Posted By CRIME DIARY
On 21:18
0 comments:
Post a Comment