मुरगुड प्रतिनिधी समीर कटके
कोल्हापूर प्रतिनिधी सर्जेराव पोवार
मौनीनगर बिद्री ता कागल येथील ऍक्सिस बँकेची एटीएम मशीन 15 ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास गॅस कटरच्या साहाय्याने फोडून चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना मुरगुड पोलिसांनी तिघांना रंगे हात पकडले. उत्तम तानाजी वायदंडे वय 23 रा नाधवडे ता. भुदरगड रणजित आनंद वायदंडे वय 22 रा बस्तवडे ता कागल, विशाल बाजीराव वायदंडे वय 25 रा येवती ता करवीर या तिघांना मुरगुड पोलिसांनी इनोव्हा कार सह ताब्यात घेतले आहे. गुन्ह्याची नोंद मुरगुड पोलिसात झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हिताची कंपनी मार्फत ऍक्सिस बँकेचे मौनी नगर बिद्री येथे एटीएम मशीन कार्यरत आहे. हे मशीन5 ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास इनोव्हा कार एम एच 10 ए एन 9219 मधून आलेल्या उत्तम तानाजी वायदंडे वय 23 रा नाधवडे ता. भुदरगड रणजित आनंद वायदंडे वय 22 रा बस्तवडे ता कागल, विशाल बाजीराव वायदंडे वय 25 रा येवती ता करवीर या तिघांनी फोडण्याच्या प्रयत्न केला. एटीएम मध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेरे व अलर्ट सिस्टम मुंबई येथील कंपनीच्या मुख्य कार्यालयास सॅटेलाईटच्या माध्यमातून जोडलेले आहेत. या अत्याधुनिक यंत्रणेची पुसटशी कल्पनाही संशयितांना नव्हती.मुंबई कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सव्वा दोनच्या सुमारास बिद्री लोकेशनवरील एटीएम मध्यें संशयास्पद हालचाली, प्रखर ज्वाला व खाली ओढलेले शटर पाहून क्षणार्धात मुरगुड पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. त्यांना घटनेची माहिती दिली त्यानुसार पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांना संपर्क साधला व त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालक महादेव अबिटकर नाईट पॅट्रोलवर असणारे भारत मेटल, कृष्णा पाटील, दीपक गुमाने या रात्रगस्तीच्या पोलीसानी आपला जीव धोक्यात घालून एटीएम मशीन फोडण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तिघांना इनोव्हा कार मधील एअर गन सह रंगे हात पकडले. या कर्मचाऱ्यांना दोन वाजता माहिती मिळाली विजेच्या वेगाने हालचाल करत केवळ 10 मिनीटात ते बिद्री येथील घटना स्थळी पोहोचले. यावेळी उत्तम वायदंडे शटर ओढून एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने तोडत होता तर विशाल व रणजित बाहेर टेहाळणी करत होते. पोलीस जागेवर पोहोचल्यावर विशाल व रणजित यांनी पळ काढला विशाल मुधाळ तिट्ट्याच्या दिशेने तर रणजित कोल्हापूरच्या दिशेने दुधगंगा नदी पुलाकडे पळाला. प्रसंगावधान राखत पोलीस कर्मचारी कृष्णा पाटील यांनी एटीएम मध्ये असणाऱ्या संशयित आरोपीस पकडण्यासाठी शटर उघडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण उत्तमने आतील सिलिंग फोडून पोट माळ्यातून पलीकडील खोलीत प्रवेश केला. हातामध्ये शस्त्र असल्यामुळे दक्ष राहून कृष्णा पाटील व चालक महादेव अबिटकर यांनी उत्तम ला जेरबंद केले. तर मुधाळ तिट्याच्या दिशेने पळत सुटलेल्या विशालला पकडण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल दीपक गुमाने व भारत मेटल यांनी धाव घेतली. घटना स्थळापासून अंदाजे दीडशे दोनशे मीटर अंतरावर पाठलाग करून रस्त्याकडेला शेतात असणाऱ्या ओढ्यात विशालला पकडले. या एटीएम मशीन मध्ये 14 ऑगस्ट रोजी 20 लाख रुपये भरण्यात आले होते. तर त्यातील 15 लाख रुपये ए टी एम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी शिल्लक होते. पण चोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या संशयित चोरट्यांना त्यातील एक नोटदेखील काढता आली नाही असे सांगण्यात आले. इनोव्हा कारमधून गॅस कटर, सिलेंडर व एक एअरगन आदी साहित्य पोलिसांनी जप्त केले.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावणारे महादेव अबिटकर, कृष्णा पाटील, दीपक गुमाने, भारत मेटल यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. २०१० साली भरती झालेले कृष्णा , दीपक व भारत उत्तम खेळाडू आहेत तर 2010 साली महादेव अबिटकर सेवेत रुजू झाले. त्यांच्या कामगिरीची दखल शासन व पोलीस दलाने घ्यावी व त्यांचा यथोचित सन्मान व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान मुरगुड पोलिसांनी जीव धोक्यात घालून ए टी एम मशीन फोडणाऱ्या चोरट्यांना रंगे हात पकडल्या बद्दल आम मुश्रीफ यांनी मुश्रीफ फाउंडेशनच्या मुरगुड कार्यालयात सपोनि राकेश हांडे व पोलीस कर्मचाऱ्यांच्या सत्कार केला. पोलीस उपअधीक्षक सागर गुरव यांनी पोलीस ठाण्यास भेट देवून गुन्ह्याची माहिती घेतली.
गुन्ह्यांचा तपास सपोनि राकेश हांडे करत आहेत.
0 comments:
Post a Comment