कोल्हापूर प्रतिनिधी सर्जेराव पोवार
हिंदूंच्या पारंपारिक सणांबाबत दडपशाहीचे धोरण अवलंबणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या विरोधात ३० ऑगस्टला पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पोवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे.
ते म्हणाले की, जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून हिंदूंच्या धार्मिक सणांवर अनेक निर्बंध लादले जात आहेत. कायद्याचा, नियमांचा धाक दाखवून बैठकांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना धमक्या दिल्या जात आहेत. कोल्हापुरातील मटका, जुगार अवैध व्यवसाय बंद होत नाहीत. खुनाचे आरोपी सापडत नाहीत. पैशाचे बक्षीस लावून खुन्याचा शोध पोलीस करत आहेत. मग पोलीस यंत्रणा काय कामाची असा सवालही या वेळी उपस्थित केला.
बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. गुरुवारी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी बिंदू चौकात संध्याकाळी पाचच्या सुमारास महाआरती करणार, असे संजय पोवार म्हणाले.
यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी दिला. या वेळी दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment