कुरळप ( सांगली) - दिलीप मोहिते
दि. 2 बुधवार रात्री उशिरा कुरळप ता. वाळवा
पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बाजीराव
मोरे व पोलीस दिपक सदामते, अनिल पाटील हे पुणे बेंगलोर हायवेवर रात्र गस्त घालत असताना त्यांना कणेगाव फाटा येथे महिंद्रा स्कॉर्पिओ क्र. MH42 AH 0064 ही रस्त्याच्या कडेला संशयास्पद उभी असलेली आढळून आली.
पोलिसांनी गाडीची संशयावरून झडती घेतली असता दोन इसम व अंदाजे 5 लाखांचा विमल गुटखा सापडला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही गाडी व आरोपींना कुरळप पोलीस ठाण्यात आणून सांगली जिल्हा अन्न सुरक्षा अधिकारी अनिल पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना पाचारण केले आणि 5 लाखांचा विमल गुटखा व गाडी असा 11 लाखांचा मुद्देमाल त्यांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी
आसुराम मांजू (वय25) व मोहनलाल करवासडा (वय 25) मुळ राजस्थान सध्या रा. तळेगाव पुणे या दोघांना अटक करण्यात आली आहे व पोलीस पुढील तपास करीत आहेत.
0 comments:
Post a Comment