कोल्हापूर प्रतिनिधी संदीप पोवार
11/8/2017
कसबा बावडा कोल्हापूर येथील
रिलॅक्स मित्र मंडळच्या वर्गणी पुस्तक पुजन प्रसंगी दरवर्षी प्रमाणे डाॅल्बीला फाटा देत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. आज संकष्टीचे औचित्य साधून मंडळातील कार्यकर्त्यांनी वर्गणी पुस्तक पुजन चा कार्यक्रम पार पाडला.
यावेळी जेष्ठ नागरिक नगरसेवक पापा सालपे, नामदेव पाटील, अनिल घराळ, आनंदराव कुंभार (सर),बाळासाहेब पाटील, साताप्पा पाटील, शामराव पाटील राहुल पाटील संदीप पाटील उपस्थितीत होते
नगरसेवक पापा सालपे यांनी मंडळातील कार्यकर्त्यांना डाॅल्बी न लावता गणेशोत्सव हा विधायक उपक्रम करून संपन्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
0 comments:
Post a Comment