कुरळप वार्ताहर दिलीप मोहिते
,,कुरळप येलूर शिवेवर संजय मोहिते यांच्या शेताच्या बांधावरील चंदनाचे झाड अज्ञात व्यक्तीने तोडून शेंडा व बुडका याच्या मधला खोडाचा भाग चोरून नेण्यात आला आहे. गेल्या दोन चार महिन्यापूर्वी सुद्धा ओढ्यातील झाडे चोरून नेली होती. चंदनाच्या खोडातील गाभ्यापासुन तेल निघते त्याला लाखो रुपये लिटरची किंमत आहे हे चोरांना माहिती आहे त्यामुळे असे चंदनाचे झाड तोडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे.
0 comments:
Post a Comment