संदीप पोवार - कोल्हापूर
गणेशोत्सव डॉल्बी प्रकरण : अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, डॉल्बी व ट्रॅक्टरमालकांचा समावेश
कोल्हापूर : गतवर्षीच्या सार्वजनिक गणशोत्सव मिरवणुकीत पोलिसांचे आदेश धुडकावून डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषण करणाºया शहरातील पीटीएम, फिरंगाई, प्रॅक्टीस कलब, वाघाची तालीम यांचेसह सोळा मंडळाच्या उत्सव समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, डॉल्बी व ट्रॅक्टरमालक, अशा सुमारे ७५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत. या सर्व कार्यकर्त्यांना २४ ते २८ जुलै पर्यंत सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
वर्षभरात साजºया होणाºया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातर्फे जिल्'ातील सार्वजनिक तरुण मंडळांची बैठक घेऊन, नियम डावलून डॉल्बी लावणाºया तरुण मंडळांवर कठोर कारवाई करण्याची घोषणा पोलिस प्रशासनाने केली होती. तसेच प्रत्येक मंडळाला तशी लेखी नोटीसही बजाविली होती. निवासी परिसरात ५५ डेसिबल इतक्या आवाजाची मर्यादा मंडळांना घालून दिली होती. तसेच डॉल्बी लावल्याने मानवी आरोग्यावर होणाºया विपरीत परिणामांचे जाहिरातींच्या माध्यमातून प्रबोधनही केले होते; परंतु गणेशोत्सवातकाही मंडळांनी डॉल्बीमुक्त उत्सवाचे पोलिसांचे आदेश धुडकावून डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषण केले. त्या १६ मंडळांच्या उत्सव समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, डॉल्बी मालक, ट्रॅक्टरमालक यांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. डॉल्बी लावून हिंसक नाचकाम करणाºया कार्यकर्त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण, प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनिक्षेपक मापन यंत्राद्वारे तपासलेली डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा, वृत्तपत्रांतील बातम्या, छायाचित्रे, सरकारी पंचांची साक्ष आदी पुराव्यासंह दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
आगामी गणेशोत्सवात ही मंडळे डॉल्बी लावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर जुनाराजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक निशिकांत भूजबळ यांनी उपदव्यापी सोळा सार्वजनिक गणेश मंडळांच्या विरोधात न्यायालयात अहवाल सादर केला. त्यानुसार न्यायालयाने या मंडळांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, डॉल्बी, ट्रॅक्टर, जनरेटर मालक यांना समन्स पाठवून सोमवार २४ ते २८ जुलै असे पाच दिवस न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. ही न्यायालयीन प्रक्रिया या गुन्ह्यांचा निकाल लागेपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशउत्सोवात मंडळांना डॉल्बी लावता येणार नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक भूजबळ यांनी दिली.
मंडळांची नावे अशी :
बागल चौक मित्र मंडळ, शाहूपुरी, फिरंगाई तालीम मंडळ, राजे संभाजी तरुण मंडळ, बीजीएम स्पोर्टस (शिवाजी पेठ), पिंटू मिसाळ बॉईज (लक्षतीर्थ वसाहत), पाटाकडील (पीटीएम) तालीम मंडळ, प्रॅक्टीस क्लब-सुबराव गवळी तालीम मंडळ, नंगीवली तालीम मंडळ (मंगळवार पेठ), बाबुजमाल तालीम मंडळ (गुरुवार पेठ), वाघाची तालीम मंडळ (उत्तरेश्वर पेठ), आझाद हिंद तरुण मंडळ दयावन ग्रुप, हिंदवी स्पोर्टस (ताराबाई रोड), कै. उमेश कांदेकर युवा मंच, क्रांती बॉईज, रंकाळावेश तरुण मंडळ (रंकाळा टॉवर), गणेश तरुण मंडळ (राजारामपूरी),
0 comments:
Post a Comment