दि. 15 जुलै पासून शहरात हेल्मेट सक्ती केली जाणार होती, राजकारण बाजूला ठेवून
त्याला सर्वपक्षीयांनी तीव्र विरोध केला होता.
शहराअंतर्गत सामान्य माणसाला अडचणीची ठरणारी हेल्मेटसक्ती होत असल्याने शिवसेना चांगलीच आक्रमक झाली.
कोल्हापूरात चोऱ्या, हल्ले , मारामाऱ्या यासह मटका, दारु, गुटखा, वडाप या अवैध धंद्याकडे पोलीस डोळेझाक करून दुर्लक्ष करतात व हेल्मेट सक्तीच्या मागे लागल्याचं म्हणत रॅलीने विरोध दर्शविला आहे.
याबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत शहरांतील हेल्मेटसक्ती तूर्तास स्थगित करण्यात आली आहे असे समजते पण भावी काळात
दुचाकी चालकांचं हेल्मेट वापरण्याबाबत जास्तीत जास्त प्रबोधन करून, हळूहळू सक्ती करण्याचं या बैठकीत ठरलं आहे.
0 comments:
Post a Comment