Sunday, 16 July 2017

बेपत्ता युवतीच्या शोधात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वेदगंगा नदीत भरपावसात शोध मोहिम

मुरगूड प्रतिनिधी समीर कटके

          कुरणी (ता. कागल) येथील कु. श्वेता दत्तात्रय पाटील (वय 16)  इयत्ता दहावीत शिकणारी मुलगी 13 जुलै 2017 रोजी सायंकाळी साडे सहा वाजले पासून बेपत्ता होती. वेदगंगा नदीवरील मुरगूड - भडगाव दरम्यानच्या कुरणी बंधाऱ्यातुन ती वाहून गेली असल्याचा संशय व्यक्त  होत होता. याबाबत अनेक प्रत्यक्षदर्शींनी  या दुर्घटनेची माहिती दिली.
    सायंकाळी चार वाजलेपासून जीवन ज्योत आपत्कालीन सेवा संस्था ( रेसक्यु फोर्स )  जवान,व स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे जवान यांनी यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वेदगंगा नदीत भरपावसात शोध मोहिम राबविली.गुरुवारी सायंकाळी एक मुलगी वाहून जाताना या मार्गावरुन जाणाऱ्या भडगाव व कुरणी येथील कांही जणांनी पाहील्याचे सांगीतले आहे. तिच्या नातेवाईकांनी त्या दिशेने शोध मोहीम राबवली आहे.वेदगंगा नदीवरील कुरणी बंधाऱ्याजवळून पुढील सुरुपली बंधाऱ्यापर्यंत या जवानांच्या पथकाने सायंकाळी चार वाजल्यापासून यांत्रिक बोटीच्या सहाय्याने वेदगंगा नदीत सर्वत्र या मुलीचा  शोध घेण्याचा प्रयत्न केला.पण ती मिळून आली नाही. पावसाचा जोर वाढल्याने शोध कार्यात अडथळे येत होते. सहा वाजता अंधार पडल्यानंतर मोहीम थांबवण्यात आली. आजच्या शोध मोहिमेत जीवन ज्योतचे सुनिल कांबळे,ओमकार कारंडे, कृष्णात सोरटे,हणमंत कुलकर्णी,रणजीत पाटील,तेजस देसाई याच्यासह स्वराज्य बिद्री चे दत्तात्रय वारके, गजानन रामाणे,प्रविण पठाडे,ओमकार राजीगरे,शुभम जरग यांनी  जलसंपदा यांत्रिकी विभागाचे राजन पवार ,सुरेश सांगळे,बाळू खोत,संतोष हुबळे यांनी  सहभाग घेतला. यावेळी कुरणीचे तलाठी आर.टी.पाटील,कोतवाल युवराज पाटील,पोलीस पाटील मनोज पाटील यांच्यासह कुरणीतील ग्रामस्थ व श्वेता पाटील चे नातेवाईक उपस्थीत होते.

फोटो : कुरणी ता कागल येथील बेपत्ता मुलीचा शोध घेताना जीवन ज्योत पथकाचे जवान

       § घटनेबाबत उलट सुलट चर्चा §

अपघात की आत्महत्या याबाबत संभ्रम वाढला
असून मुरगुड पोलिसात बेपत्ता नोंद असली तरी शोध मोहीम मात्र वेदगंगा नदीत सुरु आहे.
कुरणी व भडगाव गावातील काही नागरिकांनी मुलीने उडी मारल्याचे पाहिल्याचे जीवन ज्योतच्या जवानांना सांगितले आहे.

0 comments:

Post a Comment