कोल्हापूर (सर्जेराव पोवार ):
मे व जून महिन्याच्या दरम्यान कोल्हापूर शहर व उपनगरात घरफोडी करणाऱ्या चडडी-बनियन टोळीकडून ५४ घरफोडया उघडकीस आल्या असून यातील दीड किलो सोने, सव्वा किलो चांदीसह विदेशी चलनासहित ४ लाखाची रोकड व अन्य साहित्य असा एकूण ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीचा मास्टर माइंड जरी फरार असला तरी घरफोडीतील बहूतांशी माल पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.
कोल्हापूर शहर वा उपनगरात उस्मानाबादमधील चडडी बनियन गॅंगने घरफोड्या करीत धुमाकूळ घातला होता. या गॅंगला कोल्हापूर एल सी बी विभागाने अटक केली होती. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर हा मुद्देमाल सापडला असून त्यासोबत एक कॅमेरा, चाकू, फायटर, व कटावणी असे साहित्य जप्त करण्यात आले. या टोळीकडून चोरीचे सोन्याचे दागिने स्वीकारल्याप्रकरणी प्रशांत गोविंद वेदपाठक या सराफालाही अटक करण्यात आली आहे. तर या टोळीचा मास्टर मांईड व अन्य काही साथीदार फरार असून त्यांचाही शोध पोलिस घेत आहेत.
या टोळीकडून अमेरिका, थायलंड, भूतान, चीन, सिंगापूरच्या चलनी नोटा सापडल्याने या टोळीने पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर व मध्य महाराष्ट्रातही घरफोड्या केल्याचे मोहिते यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, एल सी बी विभागाचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे, अमोल माळी आदी उपस्थित होते.
या गॅंगकडून जप्त केलेला मुद्देमाल दागिने व रोकड न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित मालकांना देणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
Friday, 14 July 2017
- Home
- Unlabelled
- कोल्हापूर पोलिसांना घरफोड्या करणाऱ्या टोळीला पकडण्यात यश
कोल्हापूर पोलिसांना घरफोड्या करणाऱ्या टोळीला पकडण्यात यश
Posted By CRIME DIARY
On 23:59
0 comments:
Post a Comment