Sunday, 9 July 2017

सावधान ! १५ जुलै पासून हेल्मेट सक्ती कडक होणार , ISI मार्क हेल्मेटच वापरा - पो नि. धनंजय जाधव

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने कोल्हापूर  शहरासह संपूर्ण जिल्ह्यात 15 जुलैपासून दुचाकीस्वारांना हेल्मटसक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील हेलमेट सक्तीचा निर्णय नागरिक स्वीकारणार का, हाच महत्त्वाचा प्रश्‍न आहे. शहरातही हेलमेट सक्ती करण्याच्या निर्णयाला जनतेतून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.
            कोल्हापूर जिल्ह्याचा प्रमुख महामार्ग हा पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात आहे , याचा मार्गावर प्रामुख्याने दुचाकीस्वारांच्या अपघाताचे प्रमाण जास्त आहे तसेच गेल्या पंधरा दिवसात हेल्मेट परिधान केल्याने जीव वाचल्याचा चार घटना घडल्या आहेत या बाबतीत क्राईम डायरी प्रतिनिधीने पेठ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव  यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि , मागील काही दिवसांपासुन विशेषतः राष्ट्रीय व राज्यमार्गावर दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.येत्या १५ जुलै  पासुन हि कारवाई आणखी कडक करण्याबाबतचे आदेश "विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. विश्वास नांगरे पाटील" साहेबांनी दिले आहेत.
दुचाकी वाहन चालवताना चालक व पाठीमागे बसलेल्या व्यक्तीस देखील हेल्मेट घालणे आवश्यक आहे. हेल्मेट खरेदी करताना केवळ पोलीस कारवाई मधुन वाचण्याकरीता खरेदी न करता ISI मार्क असलेले च हेल्मेट खरेदी करणे आवश्यक आहे. या पुढे कारवाई करताना हेल्मेट ISI मार्क आहे किंवा कसे याची देखील तपासणी केली जाणार आहे.
      बरेच वाहन चालक हेल्मेट न घालता दुचाकीच्या हँडेलला अडकावुन जाताना किंवा पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात दिलेली दिसतात. या पुढे कारवाई करताना पोलीस जिथे थांबतात तेथुन पाठीमागे काही अंतरावर साधे वेशात पोलीस थांबवुन लक्ष ठेवुन कारवाई केली जाणार आहे.राष्ट्रीय व राज्यमार्गावर असणाऱ्या CCTV फुटेजचे निरीक्षण करून हेल्मेट न-घालणाऱ्या वाहन चालकांवर ई-चालान द्वारे कारवाई करण्यात येणार आहे. केवळ केसेस करणे व दंड वसुल करणे हा उद्देश नसुन सुरक्षितता महत्वाची आहे.


0 comments:

Post a Comment